जत शिक्षण विभागला पूर्ण वेळ गटशिक्षणाधिकारी द्या ; शिक्षक भारतीची मागणी

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षण विभागतील गटशिक्षणाधिकारी हे पद गेली अनेक वर्षे रिक्त आहे.त्यामुळे शिक्षण विभागतील कामकाजावर ताण पडत आहे. त्याअनुषंगाने गटशिक्षणाधिकारी पद तात्काळ भरण्यात यावे,अशी मागणी जत तालुका शिक्षक भारतीच्या‌ वतीने आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याकडे करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष दिगंबर सावंत,उपाध्यक्ष अविनाश सुतार, जितेंद्र बोराडे, रावसाहेब चव्हाण उपस्थित होते.जत तालुका हा विस्ताराने सर्वात मोठा तालुका आहे तसेच शिक्षक संख्या ही मोठ्या प्रमाणात पुर्ण वेळ गटशिक्षणाधिकारी नसल्याने त्याचा ताण यंत्रणेवर पडत आहे.तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 436 शाळामध्ये मराठी माध्यम पदे 133,कन्नड माध्यम शिक्षकांची रिक्त पदे 76 ,उर्दू माध्यम 18 अशी पदे रिक्त आहेत,तसेच तालुक्यात कन्नड माध्यमाच्या शाळा ही मोठ्या प्रमाणात आहेत. सन 2010 पासून कन्नड शिक्षकांची भरती करण्यात आली नाही,कन्नड शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली.


यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की,तालुक्याला लवकर पुर्ण वेळ गटशिक्षणाधिकारी आणण्यासाठी व कन्नड शिक्षक भरती करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.उमदी केंद्रातील शिक्षकांच्या पगारा संदर्भात मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन तो प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.


जतला पुर्णवेळ शिक्षणाधिकारी द्यावा,या‌मागणीचे निवेदन आ.विक्रमसिंह सांवत यांना देण्यात आले.