आवंढीत घरबसल्या महिलांसाठी लघुउद्योग सुरू ; आण्णासाहेब कोडग

जत,संकेत टाइम्स : अवनी हेल्पो फाउंडेशन व रेणुका महिला औद्योगिक संस्थेमार्फत आवंढी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने गावातील महीलासाठी घरबसल्या लघुउद्योग सुरू केला. यामध्ये महिलांनी कापडी पिशवी,कापडी हँडग्लोज,कापडी मास्क, कापडी टोपी, कापडी बॅग घरबसल्या तयार करून देणे.महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी हा व्यवसाय फार मोलाची कामगिरी करेल अशी आशा सरपंच आण्णासाहेब कोडग यांनी व्यक्त केली.
गावातील 55 महिलांनी ट्रेनिंग घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.गावातील जवळजवळ 500 महिलांना या व्यवसायात आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे सी आर पी उषा बाबर यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन उपसरपंच आण्णासाहेब बाबर,रेणुका महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ.रंजना बोराडे यांच्या हस्ते पार पडले.याप्रसंगी अवनी हेलपो  फाऊंडेशनचे डायरेक्टर महेश भडके, प्रशिक्षक वैष्णवी मोरे,विजय डूबल,पंचायत समितीचे कांबळे,साळुंखे,खिलारे, रत्नप्रभा कोडग व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.