हळ्ळीत विवाहितेची आत्महत्या

जत,संकेत टाइम्स : हळ्ळी ता.जत येथील विवाहिता अर्चना यशवंत पाटील (वय 20) हिने घरगुती वादातून राहत्या घरी गळपास लावून आत्महत्या केली आहे. घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत उमदी पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, विवाहिता अर्चना हिचे मुळ गाव सुसलाद असून तिचा हळ्ळी येथील यशवंत पाटील यांच्याशी एक वर्षापुर्वी विवाह झाला होता.यशवंत उच्चशिक्षित आहे,मात्र नोकरी नसल्याने सुसलाद हद्दीतील शेतीत शेती करत होता.गेल्या काही दिवसापासून त्यांच्या वाद होत होते.त्या निराशेतून बुधवारी पती,सासू-सासरे घराबाहेर गेले असताना अर्चनाने घरातील तुळीला गळपास लावून आत्महत्या केली. 


अन्य लोक घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला.पती यंशवत आप्पाराया यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे. उमदी पोलीस ठाण्याचे सा.पो.निरिक्षक दत्तात्रय कोळेकर यांनी घटनास्थळी पोहचत मृत्तदेह खाली उतरून उमदी येथे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.अधिक तपास उपनिरिक्षक श्री.सय्यद करत आहेत.