रस्ते की नाले ? | थेट रस्त्यावरून पाण्याचे मोठे प्रवाह ; रस्तेेेच पाण्याबरोबर वाहू लागले

0



जत,प्रतिनिधी : जत शहरासह तालुक्यातील अनेक रस्ते आहेत की नाले अशी काहीशी स्थिती गेल्या चार दिवसातील पावसाने झाली आहे.जत शहरातील चालण्यासाठी सुस्थितीत रस्ते नसल्याने पायी प्रवास करणे फारच त्रासदायक बनले आहे. मुख्याधिकारी,लोकप्रतिनिधीनी अनेक कामे मर्जीतील सातत्याने त्याच ठेकेदाराला दिल्यामुळे कामांचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांना गटाराचे स्वरूप प्राप्त झाले असून एखाद्या नाल्यातून प्रवास करीत असल्याचा भास होत असून; स्थानिकांना रस्ता शोधण्याचा प्रयत्न करावा लागत आहे. तालुक्यातील रस्त्याची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. तालुक्यातील अनेक रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत असल्याने अनेक ठिकाणी रस्ते शोधण्याची वेळ येत आहे. गटारी प्रवाहित नसल्याने किंबहुना गटारीच्या पैशावर ठेकेदाऱ्यांनी डल्ला मारल्याने गटारी कागदपत्री राहिल्या आहेत.





यातूनच मार्ग काढताना वाहन धारक व  पादचा-याची अक्षरश: त्रेधातिरपीट उडत आहे. चालताना रस्ता शोधावा लागत असून होत असलेली कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत.परिणामी नालेमय रस्ते कधी कोणाचा जीव घेतील यांचा नेम नाही, अशी स्थिती जत शहरासह तालुक्यातील स्थिती बनली आहे.

गटारी नसल्याने पावसाचे पाण्यामुळे

खड्डे,डांबरीकरण उखडले आहे.तालुक्यातील रस्ते निर्माण करताना पाणी वाहून जाण्याचा नियम ढाब्यावर बसवत ठेकेदारांनी शासनाच्या निधीवर डल्ला मारला आहे.परिणामी रस्त्यावरील वाहणाऱ्या नाल्याचे पाप सामान्य नागरिक,वाहन धारकांना जीव घेणारे ठरत आहे.तालुक्यात काही महिन्यात केलेल्या रस्त्यावरूनही नाले वाहत आहेत.आणखीन काही दिवस असाच पाऊस राहिल्यास आंशी टक्के रस्ते वाहून जाण्याचा स्थिती व्यक्त होत आहे.



Rate Card




जत तालुक्यातील रस्त्यावरून असे पावसामुळे नाले वाहत आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.