बसरगीत कोबडी शेतात गेल्याचा कारणावरून तिघांना मारहाण

जत,संकेत टाइम्स : बसरगी ता.जत येथे कोबडी शेतात गेली म्हणून आई व त्यांच्या मुलास चौघांनी गंभीर मारहाण करून जखमी केल्याची घटना रविवारी सकाळी साडेआकरा वाजता घडली.
सुजाता मिलिंद कोरे,समाधान मिलिंद कोरे,मुलगी शितल मिलिंद कोरे हे दोघे जखमी झाले आहेत.याप्रकरणी जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.


अधिक माहिती अशी,सुजाता कोरे यांची कोंबडी चंद्रकात कांबळे यांच्या शेतात गेल्याच्या कारणावरून लक्ष्मी चंद्रकात कांबळे,अनिल चंद्रकांत कांबळे,सुनिल चंद्रकात‌ कांबळे रा.बसरगी या चौघांनी वाईटवगळ शिवीगाळ करत सुजाता व त्याचा मुलगा समाधान,मुलगी शितल यांना गज,लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.