ऐन लसीकरणमध्ये हंगामी कर्मचारी काढला

भिवर्गी,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील कोंतेबोबलाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणासाठी गेल्या तीन महिन्यासाठी नेमण्यात आलेला कर्मचाऱ्याला 18 वर्षावरील लसीकरण सुरू असताना कामावरून काढण्यात आले आहे.त्यामुळे गैरसोय होत आहे.नेमके लसीकरण गतीने सुरू असलेल्या वेळेत कर्मचारी कपात केल्याने लसीकरणासाठी अडचणीचे ठरत आहे. तातडीने लसीकरणासाठी  पुर्वीप्रमाणे स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी,अशी मागणी सुसलादचे उपसंरपच बसवराज चौगुले यांनी केली आहे.