दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी रोकावी

जत,संकेत टाइम्स : जत येथिल दुय्यम निबंधक कार्यालय बनणार कोरोना प्रसार केंद्र बनण्याची भिती व्यक्त होत आहे,कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.जत शहरासह तालुक्यातील कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांच्या संख्येमध्ये चढउतार सुरू असतानाच येथिल दुय्यम निबंधक कार्यालयात मात्र पक्षकारांची मोठी गर्दी होत असून यामुळे कोरोना नियंत्रणात येण्याऐवजी कोरोनाचा विस्फोट झाल्याशिवाय रहाणार नाही,त्याशिवाय आतील अधिकारी,कर्मचारी,स्टँपव्हेडर यांनाही धोका निर्माण झाला आहे.जत तालुक्यातील 121 गावातील जमिनीचे व घर जागेचे व अन्य व्यवहार हे जत दुय्यम निबंधक कार्यालयात होतात.या व्यवहारासाठी तालुक्यातील पक्षकार हे या कार्यालयात येत असतात. त्यांच्याकडून कोरोना नियमांचे कोणत्याही प्रकारे पालन होताना दिसत नाही.याप्रसंगी सोशल डिस्टन्सिंग चे नियम नावालाच अशी परिस्थिती असते यासाठी प्रशासनाने योग्य ते नियोजन करावे अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान खरेदी करणाऱ्या बरोबर अनेकजण येत असल्याने गर्दी नियत्रंणा बाहेर जात आहे.


जत दुय्यम निबंधक कार्यालयात अशी गर्दी धोका वाढवत आहे.