वज्रवाड मधील एकावर अट्रासिटीचा गुन्हा दाखल

जत,संकेत टाइम्स : वज्रवाड ता.जत येथील बाबू बसगोंडा पाटील यांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी,वज्रवाड येथील सदाशिव भिमान्ना मांग(वय 45)यांची विहिर बाबू पाटील यांनी तीस हजार रुपये देऊन दोन वर्षासाठी खरेदी केली होती.मात्र त्याने कायमस्वरूपी खरेदी करून मांग यांची फसवणूक केली होती.

त्याबाबत पंचासमक्ष त्याला विचारले असता बाबू पाटील यांनी एक लाख तीस हजार दे विहिर परत फिरवून देतो असे म्हणत मांग यांच्या अधिकारावर गदा आणली होती.दरम्यान फिर्यादी मांग यांची पत्नी सुरेखा यानी पाटील यांना विरोध करताच त्यांना व फिर्यादी यांना लाथाबुक्यानी मारहाण करून जखमी करत जातीवाचक शिवीगाळ केली आहे.