रेकार्ड(अभिलेख) विभाग बनला लुटीचा अड्डा | तहसील कार्यालय बेलगाम | अधिकारी,झिरोकडून नागरिकांचा झळ

0



जत,संकेत टाइम्स : जत‌ तहसील कार्यालयातील रेकॉर्ड(अभिलेख) विभागात एक महिला अधिकारी, झिरो कर्मचारी यांचा नागरिकांना लुटण्याचा उद्योग दिवसोंदिवस वाढत चालला आहे. या विभागात रोज एक नवीन झिरो भरती केला जात आहे.त्यामुळे शासकीय अभिलेखाच्या सुरक्षितेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.तसेच या विभागात दिवसोंदिवस वाढत असलेली झिरो कर्मचारी यांची संख्या नागरिकांसाठी डोकेदुखी वाढवणारी आहे. नागरिक या विभागातील जुनी कागदपत्रे काढण्यासाठी केलेले शेकडो अर्ज पेंडींग असताना काही नागरिकांकडून आर्थिक व्यवहार करून त्यांना तात्काळ कागदपत्रे काढून दिली जात आहेत.





त्यामुळे अर्ज दाखल केलेले नागरिक दिवसेंदिवस या विभागापुढे ताटकळत उभे राहत असल्याचे चित्र दिसत आहे.तसेच जे नागरिक आर्थिक तडजोड करत नाहीत त्यांना ना ना प्रकारची कारणे सांगितली जात आहेत.रेकॉर्ड विभागाचे कामकाज दरवाजा बंद करून केले जात आहे.अर्ज सादर करून नागरिक हैराण झाले आहेत. परंतु त्या नागरिकांना कागदपत्रे मिळत नाहीत. त्यांना या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. या सर्व प्रकाराची कल्पना असतानाही तहसीलदार मात्र या गोष्टी कडे कानाडोळा करताना दिसत आहेत. त्यामुळेच या अधिकारी व झिरो कर्मचारी यांचे फावले आहे. हे झिरो कर्मचारी काही कर्मचारी, अधिकारी यांचेशी लगट करून या विभागात काम करत आहेत. हे रेकॉर्ड विभाग म्हणजे “आओ जावो घर तुम्हारा ‘ बनत चालले आहे. 






या विभागातील कामकाजावर कोणत्याही वरिष्ठ अधिकारी यांचे नियंत्रण राहिले नसल्याचे दिसून येत आहे.हि बाब नागरिकांच्या व रेकॉर्डच्या सुरक्षेच्या दृष्टीने

अतिशय गंभीर स्वरुपाची आहे. रेकॉर्ड हाताळणीचा कोणताही अनुभव नसलेले नवीन झिरो कर्मचारी या विभागात काम करताना दिसत आहेत. या विभागातील कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी या विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे.या विभागात बेजबाबदारपणे काम करणाऱ्या अधिकारी व रोजरोसपणे शासकीय रेकॉर्डची हाताळणी करणा-या व अनुभव नसणाऱ्या झिरो कर्मचारी यांचेवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.





पोलीस पाटलाच्या अहवालासाठी पाचशे रुपयाचा दर ?


जत‌ तालुक्यातील पोलीस पाटील पदाच्या परवान्याचे नुतनीकरण करण्यासाठी तहसील कार्यालया कडील गौण खनिज सहकार्य बाबतचा अहवाल देण्यासाठी येथील महिला कर्मचाऱ्याने तालुक्यातील ‌सुमारे 45 पोलीस पाटलाकडून 500-1000 रुपये घेतल्याची चर्चा आहे, पैसे न देणाऱ्या पोलीस‌‌ पाटलाचे गेल्या चार महिन्यापासून अहवाल प्रंलबित ठेवण्यात आल्याचे आरोप पोलीस पाटलांनी केले आहेत.

विशेष म्हणजे हे पैसे मागताना थेट अधिकाऱ्यांनाही पैसे द्यावे लागतात,अशा या महिला कर्मचारीकडून बेधडक पोलीस पाटील व लोंकाना सांगण्यात येते,पैसे न दिल्यास प्रस्ताव धुळ खात पडतील अशी धमकीही या कर्मचाऱ्यांने पोलिस पाटलांना दिल्याने आम्ही नाईलाजस्तव पैसे दिल्याचे काही पोलीस पाटल्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.






पोलीस पाटलाच्या अहवालासाठी पाचशे रुपये कशासाठी ?

Rate Card


जत‌ तालुक्यातील पोलीस पाटील पदाच्या परवान्याचे नुतनीकरण करण्यासाठी तहसील कार्यालया कडील गौण खनिज सहकार्य बाबतचा अहवाल देण्यासाठी येथील  कर्मचाऱ्याने तालुक्यातील ‌सुमारे 45 पोलीस पाटलाकडून 200-500 रुपये घेतल्याची चर्चा आहे, पैसे न देणाऱ्या पोलीस‌‌ पाटलाचे गेल्या चार महिन्यापासून अहवाल प्रंलबित ठेवण्यात आल्याचे आरोप पोलीस पाटलांनी केले आहेत.




विशेष म्हणजे हे पैसे मागताना थेट अधिकाऱ्यांनाही पैसे द्यावे लागतात,अशा या महिला कर्मचारीकडून बेधडक पोलीस पाटील व लोंकाना सांगण्यात येते,पैसे न दिल्यास प्रस्ताव धुळ खात पडतील अशी धमकीही या कर्मचाऱ्यांने पोलिस पाटलांना दिल्याने आम्ही नाईलाजस्तव पैसे दिल्याचे काही पोलीस पाटल्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.







तहसील कार्यालयातून देण्यात येणारे कोणतेही अहवाल देणे हे प्रशासकीय काम आहे,ते संबधित कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहेत.मुळात हा प्रकार चुकीचा व दुर्देवी असून संबधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून वरिष्ठांना अहवाल देणार आहे.



सचिन पाटील, तहसीलदार

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.