डॉक्‍टर हे "देवदूत'च ! ; दिग्विजय चव्हाण

डफळापूर, संकेत टाइम्स : आजही गावखेड्यांत डॉक्‍टरास परमेश्वराचे रूप मानले जाते. दुर्धर आजारातून मुक्त झाल्यावर किंवा अपघातानंतर मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा जीवन सुरळीत झाल्यानंतर अनेकांना डॉक्‍टरांमुळे पुनर्जन्म मिळाला, अशी भावना असते. ते तसे बोलूनही दाखवितात. अनेक रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाइकांसाठी डॉक्‍टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला "देवदूत' ठरत असतो.त्यांच्या कौशल्याने, ज्ञानाने अनेकांना जीवदान मिळते. भारतात एक जुलै हा दिवस "डॉक्‍टर्स डे' म्हणून साजरा केला जातो,असे‌ उद्गार पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी काढले.
1 जूलै डॉक्टर्स डे निमित्त डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत चोथे यांचा सत्कार करण्यात आला.त्यानिमित्त चव्हाण बोलत होते.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जत पश्चिम भागात चोथे व त्यांच्या टिमने प्रभावी काम केले आहे.त्यामुळे कोरोना रोकण्यात यश आले आहे, ते कौतुकास पात्र आहे,असे‌ यावेळी बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण यांनी सांगितले.


सिध्दनाथ उद्योग समुहाचे बाळासाहेब चव्हाण,संकेत टाइम्सचे संपादक राजू माळी,संखचे युवा नेते गुरूबसू‌ पाटील, कॉ.हणमंत कोळी,सुपरवायझर श्री.कोळी,हरि चव्हाण,श्री.पाटील उपस्थित होते.डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.अभिजीत चोथे यांचा डॉक्टर्स डे निमित्त सत्कार करण्यात आला.