सनमडीकर कुंटुबियाचे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडून सांत्वन

जत संकेत टाइम्स : माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांच्या कुंटुबियाचे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी भेट घेत सांत्वन केले.
नुकतेच उमाजीराव सनमडीकर यांचे निधन झाले आहेत.सोमवारी मंत्री कदम यांनी जत येथे सनमडीकर यांच्या निवासस्थानी भेट दिली.


सनमडीकर यांच्या पत्नी कमल, चिंरजीव डॉ.कैलास सनमडीकर यांना धीर दिला.तत्पुर्वी मंत्री कदम यांनी माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहत श्रंध्दाजली वाहिली.यावेळी आमदार विक्रमसिंह सांवत, माजी सभापती बाबासाहेब कोडग व कॉग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.