सिध्दार्थ पॉलिटेक्नीक जतमध्ये मराठीत डिप्लोमा ; डॉ.कैलास सनमडीकर यांची माहिती | प्रवेश सुरू

जत,संकेत टाइम्स : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 10 वी/12 वी नंतर डिप्लोमा इंजिनियरिंगला प्रवेश घेता यावा,त्यांचा आत्मविश्वास वाढवा यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (मुंबई) यांच्याकडून शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून प्रथम वर्षाकरिता डिप्लोमाचा अभ्यासक्रम इंग्रजी-मराठी या माध्यमातून राबविण्याचा निर्णय घेतला आहे.यांच्या सर्व परिक्षा आता मराठीतूनही देता येणार आहे.त्याशिवाय त्या कोर्सेसचा अभ्यासकम मराठीतूनच असणार आहे. 


त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे इंजिनियर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ही सुविधा सिध्दार्थ पॉलिटेक्नीक जतमध्ये सन 2021-22 पासून सुरू झाली आहे.अशी माहिती संस्थेचे चेअरमन डॉ.कैलास सनमडीकर यांनी दिली.तरी जत तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा,अधिक माहितीसाठी प्राचार्य श्री.दशरथ वाघमारे (मो.नं.8459009185 यांच्याशी संपर्क साधावा.10 वी पास विद्यार्थ्याचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.