अंकलेत वनविभागाचे शेतकऱ्यांच्या जमिनीत अतिक्रमण

डफळापूर, संकेत टाइम्स : अंकले ता.जत येथे काही ग्रामपंचायत सदस्याचे शासकीय वनविभागाच्या‌ अंकले हद्दीतील जागेतील अतिक्रमण वाचविण्यासाठी थेट माझे गट नंबर 148 मध्ये वनविभागाने अतिक्रम करून हद्द कायम करण्याचा प्रयत्न केला आहे.हा अन्याय असून वनविभागाने हा निर्णय रद्द करावा,अन्यथा आमरण उपोषण करू असा इशारा, शेतकरी शिवाजी कृष्णा खामगळ यांनी दिला आहे.खामगळ म्हणाले, नुकत्याच झालेल्या निवडणूकीत निवडून आलेल्या काही सदस्यांनी वनविभागाच्या जागेत अतिक्रमण केले आहे. त्यासंदर्भात विरोधी गटाकडून दाखल केलेल्या तक्रारीवर जिल्हाधिकारी यांच्या समोर सुनावणी सुरू आहे.जिल्हाधिकारी यांनी जत वन अधिकाऱ्यांना आपल्या हद्द कायम करून वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.त्या आदेशानुसार जत विभागातील काय अधिकाऱ्यांकडून संबधित सदस्याचे अतिक्रम वाचविण्यासाठी केलेल्या मोजणीत दुसऱ्या बाजूला असणाऱ्या माझ्या गट नंबर 148,152 अतिक्रम करून मोजणीचा चुना टाकला आहे.

मात्र प्रत्यक्षात माझे मुळ क्षेत्र असलेल्या जमिनीत अतिक्रमण करण्यामागचे गौडबंगाल काय असा सवालही खामगळ यांनी उपस्थित केला आहे.वनविभागा कडून शासकीय असलेल्या 343 गटामधील त्यांचे क्षेत्र चुर्तूसीमा निश्चित कराव्यात,माझ्यात यापुढे कोणतेही अति कम सहन करणार नाही,असा इशाराही थामगळ यांनी दिला आहे.