गणपती मंदिर ते घाटगेवाडी रस्ता कामासाठी माती मिश्रित मुरूम

जत,संकेत टाइम्स : जत शहरातून घाटगेवाडीकडे जाणाऱ्या गणपती मंदिर ते घाटगेवाडी रस्त्याच्या कामात माती मिश्रित मुरूम टाकण्यात येत आहे,यांची संबधित विभागाने तपासणी करून संबधित ठेकेदारावर कारवाई करावी,अशी मागणी युवक नेते अमित कुलकर्णी यांनी केली आहे.
अनेक दिवसापासून खड्ड्यातून सुटका होणारा हा रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.जत नगरपरिषदेच्या 8443 ठेव अंशदान जत नगर पंचायत अंदाज पत्रकीय निधीतून या कामासाठी 29,90,291चा निधी उपलब्ध झाला आहे. नुकतेच या रस्ता कामाचे उद्घाटन करण्यात आले जत. सध्या रस्त्याचे काम सुरू आहे,मात्र या कामासाठी वापरण्यात आलेला मुरूम मातीमिश्रीत टाकण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा रस्त्यावर खड्डे पडणार आहेत.
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांर्भिर्याने याकडे लक्ष द्यावे अन्यथा येथील रहिवाशासह आंदोलन करू,असा इशाराही कुलकर्णी यांनी दिला आहे.


गणपती मंदिर ते घाटगेवाडी रस्त्याच्या कामासाठी असा मातीमिश्रीत मुरूम वापरण्यात येत आहे.