जतेत पोलीसाचा कारवाईचा दणका

जत,संकेत टाइम्स : जत शहरात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने उघडण्यासाठी अद्याप परवानगी दिलेली नाही.करीही दुकाने उघडलेल्या दुकानदारांना बुधवारी जत पोलीसांनी दणका दिला.कोरोनाचा प्रभाव अद्याप कायम आहे, त्यामुळे जमावबंदी,गर्दीला अटकाव करण्यात येत आहे. पुढे 12 तारखेपर्यत निर्बंध कायम ठेवल्याने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. तरीही नगरपरिषदेच्या दुर्लक्षाने मोठ्या प्रमाणात दुकाने ,हातगाडे उघडी असल्याचे पोलीसांच्या निदर्शास येतात बुधवारी पोलीसांच्या पथकाने चांगलाच कारवाईचा दणका दिला.रस्त्यावर लाललेले काही हात गाडे चालकांना ताब्यात घेतले आहे.त्याचबरोबर नगरपरिषदेकडून दोन दुकाने सील केली आहेत.दरम्यान सोशल डिस्टसिंग, मास्कचा‌ वापराला हारताल फासला होता.गेल्या आठ दिवसात काही प्रमाणात दुकाने सुरू होती.


मात्र पुन्हा सोशल डिस्टसिंग,मास्कचा नियम ढाब्यावर बसल्याने पोलीसाकडून बुधवारी कारवाई करण्यात आली.
काही हातगाडे चालक व दुकानदारांना पोलीसांनी ताब्यात घेतले तर नगरपरिषदेने दोन दुकान सील केली.दरम्यान आम्ही फार अडचणीत आहोत काही वेळ तरी दुकाने चालू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी नगपरिषद व पोलीसाकडे केली आहे.

जत शहरात पोलीस कारवाईनंतर दुकाने कडकडीत बंद होती.