पुर्व भागातील विविध विकासकामाचे भूमिपुजन

जत,संकेत टाइम्स : जत‌ तालुक्याच्या पूर्व भागातील विविध गावात मंजूर झालेल्या आमदार फंड,पीएमजेएसवाय,जिल्हा नियोजन,25/15 या योजनेतून मंजूर  झालेल्या कामाचे भूमिपूजन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी,तालुकाध्यक्ष आप्पाराय बिराजदार,माजी सभापती बाबासाहेब कोडग, कार्याध्यक्ष सुजय शिंदे,जि. प.सदस्य सरदार पाटील,नगरसेवक भुपेंद्र कांबळे,माजी सरपंच मारुती पवार,व अधिकारी, गावातील सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक ग्रा.प.सदस्य शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी मौजे पाच्छापूर येथील भोसले वस्ती ते मुचंडी रस्ता मुरमीकरण करणे (आमदार फंड)10 लाख,मौजे मुचंडी येथील रावळगुंडेवाडी ते हरिजन वस्ती मधून सरकारी दवाखाना कडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (आमदार फंड)10 लाख,मौजे दरिकोनुर येथील मशिदीसमोर सभामंडप बांधने (आमदार फंड)7 लाख ,मौजे दरिकोनुर येथील दरिकोनुर गावठाण ते शेख वस्ती दाजी पारसे यांच्या घरापर्यंत मुरमीकरण करणे 25/15 मधून 10 लाख,मौजे मोटेवाडी आसंगी तुर्क येथील नागनाथ मंदिरासमोर सभा मंडप बांधणे (आमदार फंड)7 लाख,मौजे मोटेवाडी आसंगी तुर्क येथील शाळाखोल्या बांधणे (जिल्हा नियोजन )8.75 ,मौजे तिकोंडी येथील येतनाळ रस्ता(जिल्हा नियोजन)30 लाख,मौजे तिकोंडी येथील तिकोंडी ते कागणरी रस्ता डांबरीकरण करणे (जिल्हा नियोजन)20 लाख ,मौजे करेवाडी को.बो येथील करेवाडी ते जलीहाळ बुद्रुक रस्ता सुधारणा करणे (जिल्हा नियोजन)25 लाख ,मौजे को. बोबलाद येथील को. बोबलाद ते लमाण तांडा वस्ती रस्ता(पिएमजेएसवाय)248.94 लाख,मौजे को.बोबलाद येथील गडदे वस्ती येथे अंगणवाडी शाळा खोली बांधणे( जिल्हा नियोजन)8.50,मौजे को. बोबलाद येथील झेंडे वस्ती येथे अंगणवाडी शाळा खोली बांधणे (जिल्हा नियोजन)17लाख,


मौजे गुलगुंजनाळ येतील जिल्हा परिषद शाळा खोली बांधणे (जिल्हा नियोजन)8.75,मौजे लवंगा येथील चीनगी बादशाह दर्गा समोर सभामंडप बांधणे.(आमदार फंड) 7 लाख,मौजे संख  येथील संख ते बाजंत्री वस्ती रस्ता (पिएमजेएसवाय)281.23 आदी कामाचे भूमिपुजन करण्यात आले आहे.जत पुर्व भागातील विविध विकासकामाचे भूमिपुजन आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या हस्ते करण्यात आले.