जतचा दुष्काळ हटविण्याची शासन कठिबंध्द ; राजेंद्र पाटील-यड्रावकर

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्याचा दुष्काळ हटवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रयत्नशील असून,तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी जत तालुक्यात आणण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे 
आश्वासन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिले. कुंभारी(ता.जत) येथे सुनील बंडगर यांनी नव्याने सुरू केलेल्या जत विजापूर रोड येथे सुनील पेट्रोल पंपच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.


यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत, अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड.प्रभाकर जाधव, युवा नेते नाथा पाटील, युवक नेते काका शिंदे,सुनील पेट्रोल पंपाचे मालक सुनील बंडगर,बी.पी.सी.एल. गोवा टेरीटरी मॅनेजर अभिजीत पानारी,सेल्स ऑफिसर अभिनंदन गळतगे, देवांश लोणकर उपस्थित होते.
जत तालुक्याचा दुष्काळाचा  कलंक पुसण्याचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेही प्रयत्नशील आहेत.तालुक्यातील सिंचन योजनासाठी आमदार विक्रमसिंह
सावंत यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले. व जत तालुक्याला निधी देण्यासाठी शासन कमी पडणार नाही असे सांगत सुनील पेट्रोल पंप यांनी ग्राहकांना दर्जेदार सेवा द्यावी असे आवाहनही राज्यमंत्री पाटील यड्रावकर यांनी केले.