लांडगेवाडी -डफळापुर-जत रस्ता कामासाठी खासदारांचे प्रयत्न

तासगाव : खासदार संजयकाका पाटील यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या गुहागर ते विजापूर आणि मनमाड ते चिकोडी या राष्ट्रीय महामार्गांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात‌ यावे.


तसेच सांगली जिल्ह्यातील नवीन रस्त्यांचे प्रस्ताव, दोन्ही राष्ट्रीय महामार्गांच्या क्र, 266 जंक्शन पाईंट तसेच जत तालुक्यातून जाणारा लांडगेवाडी -डफळापुर-जत रोडचे राहीलेले कामाबाबत सविस्तर चर्चाही करण्यात आली. याबद्दल खासदार संजयकाका पाटील यांनी केलेल्या मागण्यांना ना.गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी तासगांव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक  बाबासाहेब पाटील उपस्थित होते.


खा.संजयकाका पाटील यांनी घेतली केंद्रिय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट