जत शहरातील सीसीटिव्ही यंत्रणा कधी होणार कार्यान्वित

जत,संकेत टाइम्स : जत शहरातील मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या खर्चासाठी शासकीय मंजुरी मिळाली आहे.नगरपरिषदेकडून मंजूरीच्या आडपाट्यानंतर त्याचे कामही जवळपास पुर्ण झाले आहे.मात्र गेल्या महिन्यापासून शहरात सीसीटिव्ही बसविलेले डांब शोभेच्या वस्तू बनल्या‌ आहेत.

आता त्याला कार्यान्वित करण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज आहे,असाही प्रश्न उपस्थित होत आहे.जत शहरातील या सीसी टिव्ही प्रणालीमुळे मुख्य रस्त्यावर आता कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे.एकूण 10 ते 12 सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. शहरातील जत-सांगली रोडवरील प्रांत कार्यालय,शिवाजी पेठ,संभाजी चौक असे तीन,विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर सोलनकर चौक, महाराणा प्रताप चौक, बसस्थानक बाहेर, चडचण, विजापूर वाय रोडनजिक, तर बाजारपेठेतील गांधी चौक वाचनालय चौक असे महत्वाच्या ठिकाणी सीसीटिव्ही कँमेरे बसविण्यात आले आहेत. याच रस्त्यावर शासकीय कार्यालये,सराफ व्यापारी,बँका,हॉस्पिटल, किराणा, कापड,कृषी सेवा केंद्र अशी दुकाने येतात.त्यांना या कँमेऱ्यामुळे तात्काळ सुरक्षा पुरविणे शक्य होणार आहे. त्याशिवाय प्रमुख चौकातील वाहतूक कोंडीवर ठाण्यातून नियंत्रण ठेवणे या कँमेऱ्यामुळे शक्य होणार आहे. त्याशिवाय या कँमेच्या कक्षेत किंबहुना जत शहरातील होणाऱ्या आकस्मिक घटना, जमावाला रोकणे,चोरीच्या घटना रोकणे,छेडछाडी,वादावादीच्या प्रकाराचे या सीसी टिव्हीत चित्रण होणार आहे. 


त्यामुळे पोलीस कारवाईला मोठी मदत होणार आहे. शहरातील या‌ सीसी टिव्ही प्रणालीमुळे शहर पोलीसाच्या कवेत येणार आहे. मात्र खांब,कँमेरे,केबल जोडणीनंतरही गतीने सुरू असलेले काम गेल्या महिन्या भरापासून काम रखडले आहे.त्याला कधी मुर्हर्त लागणार असाही सवाल उपस्थित होत आहे.