आ.विक्रमसिंह सांवत‌ यांच्याकडून राजू माळी यांचा सत्कार

जत,संकेत टाइम्स : जत सारख्या दुष्काळी भागात दैनिक चालविण्याचे शिवधनुष्य राजू माळी सारख्या धडपड्या युवकांने उचलले आहे,त्यांच्या दैनिकांचा विस्तार वाढवा,असे उद्गार आमदार विक्रमसिंह सांवत यांनी काढले.


संकेत टाइम्सचे संपादक राजू माळी यांचा वाढदिवसानिमित्त आ.सांवत यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा जय भारत न्युज चॅनेलचे संपादक दिनराज वाघमारे, टीव्ही न्युज मराठी वाहिनीचे संपादक नजीरभाई चट्टरकी, टिव्ही-1 मराठी न्युज चॅनेलचे संपादक मनोहर पवार,दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी अमोल कुलकर्णी,दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी बादल सर्जे,दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी विठ्ठल ऐनापुरे, दै. जनमतचे तालुका प्रतिनिधी भागवत काटकर,एसबीएन न्यूजचे तालुका प्रतिनिधी सोमनींग कोळी,स्टार महाराष्ट्र न्यूजचे तालुका प्रतिनिधी गोपाल पाथरूट,बिग मराठी वाहिनीचे जत तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटकरी,जीडीपी मराठी चॅनेलचे संपादक अमर कोळी, लेखणी सम्राटचे तालुका प्रतिनिधी शशिकांत हेगडे,जत वार्ताचे संपादक जॉकेश आदाटे,प्रगल्भ नायकचे प्रतिनिधी अनिल मदने, 'ती'चा जागर न्यूजचे तालुका प्रतिनिधी प्रणय वाघमारे आदींनी उपस्थित राहून माळी यांना दीर्घायुष्य, सुखी आणि समृद्ध जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.


आ.विक्रमसिंह सांवत‌ यांच्याकडून
राजू माळी यांचा सत्कार करण्यात आला.