लोकनियुक्त बसवराज पाटील ; एकूंडीला गतिमान नेतृत्व लाभलेले

करे अल्पज्ञानी बहु
जसा निजनतेच्याअति खळखळाट॥ 
असे पुर्णज्ञानी कमी बोलणारा।
 विना नाद वाहे जशी गंगाधारा॥

    समाजकारणाच्या चळवळीत अनेक प्रकारचे नेते असतात. काही लोक केवळ बडबड करण्यात पटाईत असतात तर, काही लोक बोलण्यापेक्षा कृती करण्याला महत्व देतात. निर्झरासारखा खळखळाट करण्यापेक्षा गंगाधारेसारखे संत वहात अवघा जत तालुका चिंब करणारा एक युवा नेता जर कोण असेल तर, ते सरपंच बसवराज पाटील साहेब होय. शांत, संयमी, मितभाषी, प्रसंगी आक्रमक, कणखर, कल्पक, चारित्र्यसंपन्न आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून बसवराज पाटील साहेब यांचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांत नावलौकिक आहे.जनहितार्थ निर्णय,पारदर्शक कारभार, कर्तव्यदक्ष, युवकसंग्रह, सरपंच संघटनेसाठी केलेले काम आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्वच्छ प्रतिमा आणि चारित्र्य संपन्नता लाभलेले एक असामान्य नेतृत्व म्हणजेच मा.बसवराज पाटील साहेब होय.


जत तालुक्यासारख्या दुष्काळी चळवळीस व्यक्तीमत्वासाठी लागणार्‍या पट्टीतील या अनेक निकषांशिवाय संयमी, स्पष्टवक्तेपणा, मनमिळावू स्वभाव, जनसेवेसाठी सदैव तत्पर आणि महत्वाची बाब म्हणजे खर्‍याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारे स्पष्टवक्ते नेते म्हणजे सरपंच बसवराज पाटील साहेब होय.
   


दुरदृष्टीने झपाटुन काम करणारं गतिमान नेतृत्व! त्यांच्यासोबत काम करतांना वेगळीच उर्जा मिळते. त्यांनी जेंव्हा पासुन सरपंच संघटनेची जबाबदारी स्विकारली आहे, त्या प्रत्येक जबाबदारीत सतत जागृत असणार नेतृत्व पाटील साहेब यांच्यात पाहावयास मिळाले. साहेबांबरोबर काम करतांना अनेक अनुभव मिळाले, मार्गदर्शन मिळाले. तालुक्यातील सरपंचांच्या, व अनेक युवकांच्या समस्या जाणणारा युवा नेता म्हणुन पाटील साहेबांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. कोणतेही काम हातात घेतांना, सुरु करतांना होणारे फायदे-तोटे, दुरगामी परिणाम यांचा विचार करुन सखोल अभ्यास करुन कामास सुरुवात करण्याची खास हातोटी  सरपंच साहेबांकडे आहे.याचा अनुभव मी खुप जवळुन घेतला आहे.
      


सरपंच साहेबांनी जतच्या जनतेच्या विविध प्रश्नांवर समस्येवर आवाज उठवुन न्याय दिला आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरणार्‍या, लोकांच्या हितासाठी राजकारण, कोणताही भेदभाव न करता प्रत्येक घटकाचे प्रश्‍न सोडवणार्‍या, नेतृत्वाने जत तालुक्यातील युवकांच्या ह्रदय सिंहासनावर अढळ स्थान निर्माण केले आहे. या असामान्य नेतृत्वाचा आज वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या कार्याचा छोटासा लेखन प्रंपचराजकीय वारसा ; 

• आजोबा कै.बसगोंडा पाटील हे‌ स्वातंत्र्य पुर्व काळातील एकूंडी गावचे मालक-पाटील होते.

• वडील श्री. चिदानंद पाटील सोसायटीचे चेअरमन,जत तालुका देखरेख संघाचे संचालक
जत तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक होते.
स्व.राजारामबापू यांचे विश्वासू कार्यकर्ते होत.

• बसवराज पाटील यांचे माजी मंत्री विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षातून झाले.ते जत तालुका संपर्क प्रमुख होते.

• 2009 साली शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा.राजू शेट्टी यांना जतेत आणून मार्केट यार्ड येथे भव्य सभा घेतली.

• 2012 साली मनसे तालुकाध्यक्ष म्हणून निवड,पक्षात प्रवेश,तीव्र दुष्काळात रामपूर येथे मनसेकडून मोफत चारा छावनी चालवली.शेकडो जनावरांनाची चाऱ्याची सोय केली.

• 2014 ला राष्ट्रीय बसवसेना या नावावर स्व:ताची संघटना स्थापन करून देशातील 11 राज्यातील लिंगायत समाजातील कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी 11 राज्याचा दौरा केली.

• बसवराज पाटील यांचे राजकीय पदार्पण माजी मंत्री विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षापासून झाली.

•जनसुराज्य पक्षाचे तालुका संपर्क प्रमुख, त्यानंतर 2009 साली जत मार्केट यार्डात शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी यांना प्रथम जतला आणून मोठी सभा घेतली.

• 2012 ला मनसे तालुका अध्यक्ष म्हणून दुष्काळी परिस्थितीत रामपूर येथे मनसे कडून मोफत यशस्वी चारा चावणी चालवली.

• 2014 ला राष्ट्रीय बसवसेना या नावावर स्वतःची संघटना स्थापन करून देशातील 11 राज्यातील लिंगायत समाजातील कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी 11 राज्यांचा दौरा केला.


• 2017 साली एकुंडी ग्रामपंचायतचे प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणून थेट जनतेतून सरपंच व एकुंडी वार्ड क्र 2 मधून सदस्य असे दोन्ही जागेवर विजय मिळवला.

• तेव्हा पासून एकुंडी गावाच्या विकासासाठी तत्कालीन आमदार विलासराव जगताप यांच्या गटात सामील होऊन एकुंडी गावाला लाखो रूपयाचे निधी खेचून आणला.आणि तेव्हा पासून अविरत झटणारे युवा नेतृत्व..

• एकुंडी गावाचे तालुक्याच्या पटलावर सुप्रसिद्ध करणारे युवा नेते..

• सरपंच बसवराज पाटील हे सध्या माजी आमदार विलासराव जगताप यांचे कट्टर समर्थक मानले जातात.

• विलासराव जगताप यांनी बसवराज पाटील यांच्यावर भाजपा जत तालुका युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष या पदाची जबाबदारी दिली आहे.

शंब्दाकन : 
राजाराम जावीर
सरपंच ग्रा.पं.कुंभारी