जत शहरात मोकाट जनावराचा तिघावर हल्ला

जत,संकेत टाइम्स : जत शहरात मोकाट जनावरांचे कळपातील एका गाईने शहरातील तिघावर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे.
शनिवारी सायकांळी पाचच्या दरम्यान शहरातील मार्केट यार्ड,शिवानुभव मंडप परिसरात या गाईने धुमाकूळ घातला होता.काही जणांना या गाईने पाठलाग करून हल्ला केला.यामुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.नगरपरिषदेच्या बेजबाबदार पणामुळे शहरात मोकाट जनावरांचा थव्वेच्या थव्वे झुंडीने फिरत आहेत.ते कोणत्याही वेळी आक्रमक होत आहेत. अनेक जणावर यापुर्वी या मोकाट जनावरांने हल्ले केले आहेत.त्याशिवाय रस्त्यावर अनेक अपघातही झाले आहेत. 
शनिवारी मात्र मोकाट जनावरांचा फटका शहरातील नागरिकांना बसला.कळपातील एका गाईने पाठलाग करून तिघांना थेट शिंगावर घेत जखमी केले आहे.


त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.आतातरी नगरपरिषदेचे डोळे उघडणार काय काही नाहक जीव गेल्यावर कारवाई होणार असा संतप्त सवाल नागरिकातून उपस्थित होत आहे.