धकाधकीच्या जीवनात आरोग्य महत्वाचे ; आ.विक्रमसिंह सांवत | क्रिडा संकुलात ओपन जीमचे लोकार्पण

जत,संकेत टाइम्स  : धकाधकीच्या जीवनात सर्वांनीच आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे; त्यासाठीच सहज साधने उपलब्ध व्हावीत, यासाठी ओपन जिमची संकल्पना जतमध्ये रूजेल,क्रिंडा संकुल उभारलेल्या या जीमचा फायदा  नक्की होईल.या माध्यमातून शहरातील नागरिकांनी स्वत:चे आरोग्य सदृढ करावे,असे आवाहन आमदार विक्रमसिंह सांवत यांनी केले.
सांगली रोडच्या‌ क्रिडा संकुलात उभारण्यात आलेल्या ओपन जिमच्या उद्घाटनप्रसंगी रविवारी सकाळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.सांवत म्हणाले, आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्यानंतर आपण रुग्णालयाची पायरी चढतो. त्यावेळी अख्खे कुटुंब हतबल होते. त्यासाठी घरातील सोने आपल्याला प्रसंगी गहान ठेवावे लागते; त्यामुळे आरोग्य चांगले व्हावे यासाठी व्यायामाची गरज आहे. दैनंदिनी धकाधकीची जीवन आपण जगत आहोत. अशा वेळी फावल्या वेळात व्यायाम करता यावा; यासाठी जिम उभारली आहे.


यावेळी तहसीलदार सचिन पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी श्री.वाघमारे,तालुका क्रीडाधिकारी श्री.मोरे,माजी सभापती मबाबासाहेब कोडग,माजी नगरसेवक महादेव कोळी,नगरसेवक भुपेंद्र कांबळे,सलीम पाच्छापूरे,योगेश एडके,आकाश बनसोडे,श्री.बिराजदार सर क्रीडा संकुलाचे पदाधिकारी,खेळाडू यावेळी उपस्थित होते.क्रीडा संकुल येथे ओपन जिम झाल्याने खेळाडू,व्यायाम प्रेमी नागरिक,आणि जेष्ठ नागरिक यांच्या कडून आनंद करण्यात येत आहे.


जत‌ येथील क्रिंडा संकुल येथे‌ ओपन जीमचे आ.विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.