जत शहराच्या विकासासाठी दोन कोटीची मागणी : दिनकर पतंगे

जत,संकेत टाइम्स : जत विधानसभा हा शेवटचा 288 मतदार संघातून जत शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे.जतला नगर परिषद आहे.या नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात एकूण दहा प्रभाग असून प्रत्येक प्रभागांमध्ये अनेक समस्या आहेत.ते सोडविण्यासाठी दोन कोटीचा निधी द्यावा,अशी मागणी मी केली असल्याची माहिती शिवसेनेचे महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पंतगे यांनी सांगितले.पंतगे म्हणाले,प्रत्येक प्रभागांमध्ये व विस्तारित क्षेत्रांमध्ये अंतर्गत रस्ते बंदिस्त गटारी स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुसज्ज अंगणवाड्या सुलभ शौचालय तसेच मध्यवर्ती ठिकाणी महिलांच्यासाठी सार्वजनिक शौचालय, सुसज्ज कामगार भवन,सुसज्ज कलाकार भवन कामे होण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही जत शहराला दोन कोटीचा निधीची गरज आहे.


जत शहरातील सेंटरींगचे काम करणारे कामगार यांना एकत्रित करून त्यांना शिव संपर्क अभियान बाबत मार्गदर्शन करण्यात आले.त्यांच्या अडचणी समजून घेतल्या तसेच माझा गाव कोरोना मुक्त गाव याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सेंट्रींग कामगाराचे शाखाप्रमुख श्री पांडुरंग गावडे उपस्थित होते.