मोटारसायकलच्या धडकेत एक ठार

जत,संकेत टाइम्स : जत-उमराणी रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी मोटारसायकलच्या धडकेने शिवशंकर तुकाराम पोतदार (वय
50, रा. उमराणी रोड, जत) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रमेश लक्ष्मण सरगर (रा. येळदरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. फिर्याद ऋतुराज शिवशंकर पोतदार यांनी दिली आहे.जत पोलिसांनी दिलेली माहिती
अशी : पोतदार चालत निघाले होते. उमराणी कडून येणाऱ्या सरगर यांच्या मोटार सायकलने त्यांना धडक दिली. ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.