स्वच्छ शहर योजनेचा फज्जा | शहरभर नाले तुंबले | दुर्गंधी,डासाचे थैमान | काय करतेय नगरपरिषद

0



जत : शहरात नालेसफाई होत नसल्याने पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासह जलजन्य आजारांची भीती वाढली आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.



शहरात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शहरातील नाल्यांची सफाई होत नसल्याने दुर्गंधी वाढली आहे. त्यामुळे विविध आजारांची भीती व्यक्त होत आहे. शहरातील विविध गल्ली,बोळ,मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या भागात तापाचे रुग्ण वाढत आहेत.काही ठिकाणी डेंग्यूसदृश्य आजाराचे रुग्ण आढळत आहेत.



Rate Card



शहराला शुध्द पाणी पुरवठा करावा, प्रत्येक गल्लीत फवारणी करावी, तुंबत असलेल्या पाण्याची विल्हेवाट लावावी, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन जनजागृती करून उपाययोजना राबवावी, अशी मागणी होत आहे




आरोग्य विभागाकडून तपासणी

शहर व तालुक्यातील घराेघरी जाऊन आरोग्य विभागाच्यावतीने तपासणी करण्यात येईल. रुग्णांना तत्काळ उपचार दिले जातील. स्वच्छतेसंदर्भात नगरपालिकेला सूचना करण्यात येतील. शहरात डेंग्यूसदृश्य रुग्ण आढळत असतील तर घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून उपाययोजना करण्यात येईल.

– डॉ. संजय बंडगर, तालुका वैद्यकीय अधिकारी.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.