महात्मा फुले महामंडळाच्या कर्ज योजनेचा लाभ घ्यावा : भूपेंद्र कांबळे

जत,संकेत टाइम्स : एनएसएफडीसी नवी दिल्लीच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळामार्फत कोरोणाच्या जागतिक महामारीमुळे अनुसूचित जाती-जमातीच्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाला असेल व त्या कुटुंबाचे पुनर्वसन गरजेचे आहे, त्यामुळे त्यांच्या व्यवसायासाठी कर्ज मिळू शकते.एक ते पाच लाख रुपया पर्यंत एनएसएफडीसी मार्फत कर्ज मिळू शकते.त्याचा व्याजदर 6 टक्के असून कर्जफेडीचा कालावधी सहा वर्षाचा आहे.या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन दलित पँथरचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जत नगरपरिषद नगरसेवक भूपेंद्र
कांबळे यांनी केले आहे.नगरसेवक भूपेंद्र कांबळे म्हणाले की, या कर्ज योजनेसाठी लाभार्थी अर्जदार हा अनुसूचित जाती जमातीचा असावा.अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापर्यंत असावे. अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा, शिवाय मृत्यू पावलेल्या व्यक्तींची वयोमर्यादा 18 ते 60 दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असावी. 


त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अशी: महानगरपालिका किंवा नगरपालिका यांनी दिल्या मृत्यूचे प्रमाणपत्र,स्मशानभूमी प्राधिकरनाने दिलेली पावती,एखाद्या गावात स्मशानभूमीत नसल्यास गटविकास अधिकार्याने दिलेले मृत्यु प्रमाणपत्र, मयत व्यक्तीचे नाव व पत्ता,आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला (तीन लाखापर्यंत),कोविडमुळे मृत्यू पावल्या व्यक्तीचा मृत्यू दाखला, 


रेशन कार्ड व त्याचे प्रमाणपत्र ही माहिती महामंडळच्या संकेत स्थळावर भरण्याची आहे.तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी जत येथील किस्मत चौक येथील ऑफिसमध्ये संपर्क करण्याचे आवाहन कांबळे यांनी केले आहे.