जत तालुक्याच्या विकासात्मक रेल्वेच्या मागण्यासाठी प्रकाश जमदाडे यांचे निवेदन

जत,संकेत टाइम्स : रेल्वे बोर्डाच्या सोलापूर विभागाच्या ऑनलाइन होणाऱ्या बैठकीमध्ये बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी या परिसरातील विविध मागण्या मांडल्या असून या भागाच्या विकासासाठी या महत्वपूर्ण ठरतील,असे सुचित केले आहे.
जत रोड रेल्वे स्टेशन येथे लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्यावा, जत रोड हे जत तालुक्यातील एकमेव स्टेशन आहे,जत बरोबरच त्याचा उपयोग आटपाडी तालुक्याला होणार आहे,या ठिकाणाहून व्यापारी, सैन्यदलातील सैनिक यांना मिरज किंवा सोलापूर या ठिकाणी जावे लागते तसेच आटपाडी व जत तालुक्यातील अनेक गलाई व्यावसायीक भारत देशातील वेगवेगळ्या शहरात व्यापार करीत आहेत. तरी कोल्हापूर-नागपूर, पंढरपूर-बेंगलोर इ. अतिजलद गाड्यांना जत रोड स्टेशन थांबा देणेत यावा म्हणजे प्रवाशी, व्यापारी, सैनिक व गलाई व्यावसायिक यांची सोय होणार आहे.महालक्ष्मी किंवा कोयना एक्सप्रेस जत रोड स्टेशन वरून सोडावी,जत तालुक्यातून दररोज जवळपास 20 ते 25 खाजगी बसेस जातात दोन्ही पैंकी एक ट्रेन या ठिकाणाहून सोडलेस हजारो नोकर, कामगार यांची सोय होणार आहे. याचा फायदा आटपाडी व जत तालुक्यांना होणार आहे.दादर-पंढरपूर एक्सप्रेस मिरज पर्यत सोडावी.मिरज हे आरोग्य पंढरी असून सांगोला-जत-आटपाडी या तालुक्यातील रूग्ण, व्यापारी यांची
सोय होणार आहे.पंढरपूर-मिरज पैसेंजर (मेमू) दररोज सुरू करावी.सांगोला,जत, आटपाडी या तालुक्यातल औद्योगिक कामगार, शेतकरी, व्यापारी व रूग्ण यांच सोय होणार आहे म्हणून दररोज सकाळी 6.00 ते 7.00 दरम्यान पंढरपूर-मिरज व संध्याकाळी 5.00 ते 6.00 दरम्यान मिरज-पंढरपूर सुरू करावी जेणेकरून या लोंकाना काम करून परत आपले गावी येता येईल.क्रॉसीग आरयूबी मोठा किंवा उड्डानपूल करावेत,गुहाघर-कराड-जत-विजापूर हा राज्यमार्ग असून दोन राज्यांना जोडणारा अतिशय महत्वाचा मार्ग आहे. तसेच हा रस्ता 4 पदरी पूर्ण कॉक्रीटकरण झाला आहे.त्यामुळे वाहतूक वर्दळ वाढलेली
आहे.

पंरतु चोरोची ता. कवटेमहंकाळ येथे असणारा अतिशय अरूंद व कमी उंचीचा असलेने रस्ता उच्च दर्जाचा होऊन ही जड वाहतूक होऊ शकत नाही या ठिकाणी पूलाची रुंदी व उंची वाढवावी किंवा उड्डानपूल बांधणेत यावा.सांगोला ते मिरज दरम्यान गावे क्रॉस करणेसाठी आरयूबी बांधले आहेत पंरतू पावसाळ्यात पाणी साठत असलेने वहातूक / मोटार सायकली पायी जाणारे नागरीक यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे,तरी या ठिकाणी पाण्याचा निचरा होणेसाठी योग्य ती कार्यवाही करावी,अशी मागणीचे‌ निवेदन विभागीय व्यवस्थापक यांना जमदाडे‌ दिले आहे.