महामार्ग अधिकाऱ्यांना आमदारांनी खडसावले | गतीने,दर्जेदार कामे करण्याचे आदेश

0



जत,संकेत टाइम्स : जत‌ शहरातून जाणाऱ्या विजापूर-गुहागर,जत-नरसिंहगाव,सांगोला,अथणी या राष्ट्रीय महामार्गाला ठेचून करण्यात‌ आलेली अतिक्रमणे तात्काळ काढण्याचे आदेश आमदार विक्रमसिंह सांवत यांनी प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.





जत शहरातील या राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट, रेंगाळत सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आ.सांवत, प्राधिकरण विभागाचे अधिकारी, प्रांताधिकारी प्रंशात आवटे, तहसीलदार सचिन पाटील यांची पंचायत समिती ‌सभागृहात‌ बैठक झाली.

जत शहरासह तालुक्यात महामार्गाची कामे अनेक ठिकाणी निकृष्ट झाली आहेत.त्याशिवाय गटारी,ब्लॉकच्या कामाबाबत‌ सातत्याने तक्रारी येत आहेत.






त्यामुळे आमदार सांवत यांनी संबधित विभागाच्या‌ अधिकाऱ्यांना चांगलेच‌ खडसावत गतीने,नियमानुसार कामे करण्याचे आदेश दिले.त्याशिवाय शहरातून जाणाऱ्या जत -कवटेमहांकाळ या रस्त्याचे रखडलेले काम तातडीने करावे,नवे कामात पडलेले खड्डे भरावेत,विजापूर-गुहागर रस्त्याला ठेचून अतिक्रमण झाल्याने पुन्हा रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे ती अतिक्रमणे काढावीत,ब्लॉक बसविणे,गटारी,सीमेंट कॉक्रीटीकरण अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. त्या तात्काळ दुरुस्त कराव्यात अशा सुचना दिल्या.


Rate Card




जत शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत शहरात जाणारे रस्ते हे खूप खाली झाले आहेत. त्याची उंची वाढवावी.तो रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडावा.उमदी ते कर्नाटक हदीपर्यंतच्या बालगाव, हळ्ळी व  इतर गावातील रस्त्यावर खड़े दुरुस्ती तसेच सीडी वर्कची कामे पूर्ण करावीत.उमदी व शेगाव ब्लॉकच्या या गावातून जाणाऱ्या रस्त्यांच्या बाजूच्या गटारीच्या कामाचा प्रस्ताव तातडीने तयार पेव्हिंग बसवावेत अशा सूचना आमदार सावंत बैठकीत यांनी दिल्यानिकृष्ट तसेच मंगळवेढा-उमदी मार्गावर उमदी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिन पाण्याखाली जाणार असल्याने सिमेंट पाईपचा वापर तातडीने करावा.शेतकऱ्यांच्या आ मागणीनुसार कामे मार्गी लागली पाहिजेत अशा ते सूचना आमदार सावंत यांनी केल्या. तसेच खडीकरण जत-सांगोला या महामार्गालगत असणाऱ्या डांबरीकरणास चव्हाण वस्ती,माळी वस्ती, गडदे वस्ती चौक कडे जणाऱ्या रस्त्याची सुधारणा करण्याची  सूचना आमदार सावंत यांनी दिल्या. 





तसेच काही जत-सांगोला या रस्त्यावरील निकृष्ट पेव्हिंग अधिकाऱ्यांनी पाहणी करावी.ब्लॉकच्या विषयावरही बैठकीत चर्चा झाली.रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी निकृष्ट पेव्हिंग ब्लॉकचा विषय उचलून धरला होता.बैठकीत सरदार पाटील यांनी हा विषय मांडत निकृष्ट पेव्हिंग ब्लॉक बसविले जात असल्याचे आ. सावंत व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सध्या सुरू असलेल्या कामाची माहिती आ. सावंत यांनी माहिती घेतली.तसेच संभाजी चौक ते पोलीस स्टेशन पर्यंतच्या रस्त्याचे सध्या खडीकरण करावे. पावसाळा कमी झाल्यानंतर डांबरीकरनास सुरुवात करावी.तसेच सोलनकर चौक ,खतीब शोरूम ते शिवाजी पेठ या रस्त्याचे निविदा प्रक्रिया झाली आहे.येत्या काही दिवसात डांबरीकरण होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.




Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.