जतच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आ.सावंत यांचे‌ साकडे

जत,संकेत टाइम्स : जत‌च्या विविध प्रश्नावर आमदार विक्रमसिंह सावंत यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, गृहराज्यमंत्रीसतेज पाटील,कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांची भेट घेत विविध मागण्याचे निवेदन दिले. 


जत तालुक्याच्या पूर्व भागास तुबची- बबलेश्वर योजनेचे पाणी मिळण्यासाठी कर्नाटक सरकार बरोबर करार करून जत पुर्व भागातील वंचित गावांना पाणी पोहचविण्यासाठी योजना आखावी. तालुक्यातील रिक्त पदांची माहिती देऊन त्या रिक्त जागा भरण्यात याव्यात.जत तालुक्याचे विभाजन करण्यात यावे,जत येथील दिवाणी न्यायालयासाठी प्रशस्त इमारत बांधकामाची गरज आहे.जत उमदी येथील प्रशस्त पोलीस निवासस्थान बांधकाम करावे.

जत येथील ट्रामा केअर सेंटर सुरु करावे, क वर्ग भटक्या समाजबांधवांसाठी 23 योजना असून त्यास योजनेस निधीची मागणी करण्यात आली.यावेळी जत तालुका कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पाराया बिरादार,माजी पं.स.सभापती बाबासाहेब कोडग,कार्यध्यक्ष सुजय शिंदे,दान्नम्मा दुध संघाचे संचालक रावसाहेब मंगसुळी उपस्थित होते.


जत तालुक्यातील विविध प्रश्नासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंची आमदार विक्रमसिंह सांवत यांनी भेट घेऊन निवेदन दिले.