रितूराज चँरिटेबल ट्रस्टकडून 'डॉक्टर डे' निमित्त डॉक्टरांचे सत्कार

उमदी : उमदी ता.जत येथील रितूराज चँरिटेबल ट्रस्टच्या डॉक्टर्स डे उत्साहात‌ साजरा करण्यात आला.यावेळी उमदीतील डॉ.डी.ए.मिरजकर,डॉ.रविंद्र हत्तळी,डॉ.राजकुमार भद्रगोड,डॉ.म्हेत्रे,उमदी प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी  डॉ.गजानन गुरव,डॉ.लोणी यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन विविध मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.


कोरोनाच्या महामारीमध्ये डॉक्टर्स आणि इतर आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवेसाठी दिलेले योगदान महत्वाचे आहे. त्यामुळे एक दिवस डॉक्टरांच्या कामाला समर्पित म्हणून असायला हवा. आजचा दिवस म्हणजेच 1 जुलै देशातभरात डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो.


उमदीही यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रितूराज चँरिटेबल ट्रस्ट, व स्वामी विवेकानंद बचत गटाचे‌ पदाधिकारी उपस्थित होते.उमदी रितूराज चँरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांचे सत्कार करण्यात आले.