जत तालुक्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक | जत शहर,डफळापूर, गुळवंची,बिळूर,शेगाव हायरिस्कवर

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे.बुधवारी तब्बल 66 नवे रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे.


बुधवारी जत शहर,बिळूर,माडग्याळ,
शेगाव,गुळवंची,डफळापूर येथे पाचपेक्षा जादा रुग्ण आढळून आल्याने भिती वाढली आहे.तालुक्यात गेल्या पंधरवड्यात कोरोनाचा प्रभाव कमी होण्या अगोदरच व्यवहार,लग्न संभारभ,सार्वजनिक उद्घाटने,कार्यक्रम सुरू करण्यात आल्याने पुन्हा कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे.बुधवारी पंधरा दिवसातील बुधवारी उंच्चाकी आकडा नोंद झाला आहे.तालुक्यात 31 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत,तर 550 रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यापैंकी 473 रुग्ण सध्या होम आयसोलेशन मध्ये आहेत.
जत 16,बिळूर 6,मेंढिगिरी 1,सिध्दनाथ 1,आसंगी जत 1,व्हसपेठ 1,माडग्याळ 7,कागनरी 1,उमदी 1,शेगाव 8,हिवरे 2,गुळवंची 9,डफळापूर 7,बेंळूखी 3,शिंगणापूर 1,खलाटी 1 असे 66 रुग्ण बुधवारी आढळून आले आहेत.त्यामुळे तालुक्यात एकूण रुग्ण संख्या 11,514 वर पोहचली आहे.