पाऊसाची हजेरी,शेतकरी सुखावला

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात गेल्या आठवड्यापासून गायब झालेला पाऊस मंगळवार पासून पुन्हा परतल्याने शेतकरी सुखावला आहे.अनेक दिवस पावसाने माना टाकलेली पिकांना जीवदान मिळाले आहे.
जत तालुक्यात खरीप हंगामात कृषी विभागाच्या नोंदीपेक्षा जादा पिंकाची लागवड करण्यात आली आहे.खरीपाच्या सुरूवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने मका,बाजरी,उडीद,तुर,सह कडधान्य पिकांची चांगली उगवण झाली होती.मात्र गेल्या आठ दिवसापासून पावसाने ओड दिल्याने पिके माना टाकू लागली होती.मात्र दोन दिवसाच्या उन्हाच्या तडाक्यानंतर पावसाने सुरूवात केली आहे. तालुक्यातील ‌जवळपास सर्व गावात हजेरी लावली आहे.