एपीआय कोळेकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप ; रविपाटील,तेली

जत,संकेत टाइम्स : उमदी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्यावर काही जणाकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत,असे वक्तव्य माजी सभापती
तम्मणगौडा रवी पाटील व उमदी येथील भाजपाचे युवा नेते संजय तेली यांनी पत्रकार परिषदेत केले.    

पाटील,तेली म्हणाले,
एका प्रामाणिक अधिकाऱ्यांवर वैयक्तिक द्वेषापोटी काहीजण बिनबुडाचे आरोप करत आहेत.दत्तात्रय कोळेकर यांचे काम कौतुकास्पद असून त्यांनी परिसरातील सर्व अवैध धंदे बंद केले आहेत.कोरोना काळामध्ये त्यांच्यासह पोलिसांनी रात्रंदिवस काम केले आहे.मोटारसायकली जप्त करणे,विना कारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई,गावागावात संचार बंदीची कडक अंमलबजावणी केली होती.


त्यामुळे तालुका व्यापलेला कोरोना या भागात रोकण्यात यश आले होते.
पोलिसांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणणे हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यात जे आरोपी आहेत. त्यांनाच पकडण्यात आले आहे.मटका, जुगार अड्डे, बेकायदेशीर दारू विकणाऱ्यांवर सारखी कारवाई सुरूच आहे.अनेक गुन्हे करून फिरणाऱ्यांना कोळेकर यांनी कायद्याचा दणका दिला आहे. मात्र अवैध धंदे चालकांना पाठीशी घालणारे काहीजण कोळेकर यांच्यावर बेताल आरोप करत आहेत. ते पुर्णत; बिनबुडाचे आहेत.अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना साथ देण्याचा गरज आहे,मात्र त्याची चौकशी करा,बदली करा म्हणून मागणी करत आहेत. आम्ही कोळेकर यांच्या बरोबर आहोत,असेही पाटील,तेली म्हणाले.