शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन रविशंकर माळी या शि.द.गटाकडून सत्कार

जत,संकेत टाइम्स : जत तालुका प्राथमिक शिक्षक संघ शि.द.गटाकडून सेवानिवृत्त गट शिक्षण अधिकारी भाऊसाहेब जगधने,रघुनाथ शिंदे व सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे नूतन चेअरमन शिवशंकर माळी यांचा तालुकाध्यक्ष भारत क्षिरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी भारत क्षीरसागर म्हणाले की,
दोन्ही अधिकाऱ्यांनी अतिशय प्रामाणिक पणे शिक्षण क्षेत्रात काम केलेले आहे.त्यांनी सर्व शिक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून अप्रगत मुलांच्या साठी स्वतंत्र कार्य पुस्तिका तयार केली आहे.त्याचा फायदा सर्व विद्यार्थी पालक व शिक्षकांना होत आहे. शिवशंकर माळी सर हे पतसंस्थेचे चेअरमन झाल्याचा आनंद व्यक्त करुन त्यांच्या हातून सभासद व पतसंस्थेचे  कार्य उत्कृष्ठ व्हावे.यावेळी डॉ. हिट्टी, उपसभापती विष्णू चव्हाण,हिरगोंड,श्री.जमदाडे, गुंडा मुंजे,तानाजी टेंगले,विष्णू ठाकरे, गुब्बु चौगुले,सिद्धेश्वर कोरे आदी शिक्षक उपस्थित होते.