कापड व्यापारी मल्लिकार्जुन मोगले यांचे निधन

0



जत,संकेत टाइम्स : जत येथील प्रसिद्ध कापड व्यापारी मल्लिकार्जुन शिवप्पा मोगले (मल्लूकाका जवळेकर) यांचे दि.21 जूलै 2021 रोजी वृध्दापकाळाने निधन झाले.

त्यांनी बनाळीचे प्रसिध्द देवस्थान श्री. बनशंकरी देवस्थानचे अध्यक्ष व जत अर्बन बँकेचे संचालक म्हणून काम पहिले आहे.त्यांची श्री.बनशंकरी देवीवर मोठी श्रध्दा होती.






बनाळी येथील श्री.बनशंकरी देवीच्या मंदिरासह परिसरात त्यांनी मोठा बदल घडवून आणला, ते बनाळी व जत येथील विविध सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रस्थानी असायचे.जत शहरात त्यांचे मोठे कापड दुकान आहे, जवळा व जत शहरात त्यानी कापड व्यवसायात जम बसवित भरभराटीला आणला आहे. मूळ गाव जरी जवळा असले तरी त्यांची कर्मभूमी जत होती. जत शहरातील सामाजिक कार्यात पुढे असणार्‍या काही मोजक्या व्यापार्‍यांपैकी ते एक होते, शहरात त्यांना मोठा मान होता. 

Rate Card


अखेर पर्येत नम्र स्वभाव असलेले मल्लिकार्जुन शिवप्पा मोगले (जवळेकर) याची अखेर प्राणज्योत बुधवारी मावळली. त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुले सुना, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.