छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम पुर्ण

जत,संकेत टाइम्स : जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे काम पुर्ण झाले असून शिवाजी पेठ येथे तयार केलेल्या चबुतऱ्यावर तो पुतळा बसविण्यात येणार आहे.

2015 पासून चालू असलेले महाराजांच्या पुतळ्याचे काम अखेरीस पुर्ण झाले आहे.
लवकरच हा भव्य आणि दिमाखदार पुतळा शिवाजी पेठ येथे उभारलेल्या चबुतऱ्यावरच विराजमान होणार आहे. सदरच्या पुतळ्याचे काम माजी आमदार विलासराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व त्याच्यांच प्रयत्नातून हे काम पूर्ण झाले आहे.सदरच्या पुतळ्यासाठी आतापर्यंत 12 लाख रुपये रोख स्वरूपात मूर्तिकार यांना दिले आहेत.आणखीन 4 लाख रुपये त्यांना द्यावयाचे आहेत,अशी माहिती माजी नगरसेवक उमेश सांवत यांनी संकेत टाइम्सशी बोलताना दिली.
पुतळ्याच्या अंतिम टप्प्यातील कामाची पाहणी माजी आमदार विलासराव जगताप,सभापती प्रकाश माने,शहराध्यक्ष आण्णा भिसे, गौतम ऐवळे, संतोष मोटे, प्रमोद चव्हाण, अजिंक्य सावंत, सुहास चव्हाण सर, अशोक स्वामी, संग्राम पवार व मूर्तिकार गजानन सलगर उपस्थित होते.


जत शहरात बसविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी करताना माजी आमदार विलासराव जगताप व भाजपचे पदाधिकारी