बेवनूरमध्ये एकाची आत्महत्या

जत,संकेत टाइम्स : बेवनूर ता.जत येथील शशिंकात राम सांगोलकर (वय 25) यांनी गळपास लावून आत्महत्या केली.
याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.घटना सायकांळी 5 च्या सुमारास घटना घडली आहे.
अधिक माहिती अशी, शशिंकात सांगोलकर हे गेल्या काही दिवसापासून मानसिक तणावाखाली होते.


सोमवारी घरातील अन्य लोक घरात नसल्याचा फायदा घेत‌ त्यांनी तुळीला सुती दोरीने गळपास लावून घेतला.घरातील अन्य लोक घरात आल्यानंतर हा प्रकार समोर आला.याबाबत त्यांनी पोलिस पाटील कांताबाई पाटील यांना माहिती दिली.त्यांनी जत पोलीसात वर्दी दिली आहे. पोलीस घटनास्थळी पोहचून मृत्तदेह खाली उतरून उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता.रात्री उशिरापर्यत पोलीसाचे कामकाज सुरू होते.


दरम्यान कोरोना लॉकडाऊनच्या परिणाम अनेक जण निराश झाले आहेत.आर्थिक चणचण, हाताला काम नसल्याने मानसिक तणावाखाली आहेत.परिणामी काही जण जीवनयात्रा संपवत आहेत.