जत‌ तालुक्यात कोरोना प्रभाव कायम,नवे रुग्ण अर्धशतकावर,दोघाचा मुत्यू | खलाटी,शेगाव,बिळूर,बेवनूर हायरिस्करवर

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात बुधवारी कोरोनाच्या नव्या 62 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे.तर दोन रुग्णाचा दुर्देवी मुत्यू झाला आहे.
29 रुग्ण कोरोना मुक्त झालेत तर 743 रुग्ण उपचाराखाली आहेत.
तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 11,944 पोहचले आहे, तर 10,921 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
280 रुग्णाचा बुधवार पर्यत मुत्यू झाला आहे.


तालुक्यात कोरोनाचा प्रभाव कायम असल्याचे चित्र आहे. गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे काहीसा कोरोना बाधित आकडा कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.दरम्यान तालुक्यातील यंत्रणा सतर्क झाल्या असून दुसरी लाट अद्याप कायम असल्याने ती थोपविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,असे सांगण्यात आले.

जत 4,निगडी खु 4,देवनाळ 1,काराजनगी 3,रामपूर 1,अंकले 1,खलाटी 11,बेंळूखी 1,सोर्डी 1,घोलेश्वर 1,कोळिगिरी 1,शेगाव 9,आंवढी 2,बनाळी 1,बेवनूर 8,कुंभारी 1,वाळेखिंडी 2,मोकाशवाडी 1,बिळूर 7,उमराणी 2,रावळगुडेवाडी 1,उटगी 2 असे रुग्ण आढळून आले आहेत.