जतेतील 'पुरवठा'मधील दरोडेखोरी ठेचलीच पाहिजे

जत,संकेत टाइम्स : येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात दुकानदारी तेजीत सुरू आहे. लाचखोरीला चटावलेल्या अधिकारी, कर्मचारी व एजंटांनी नागरिकांच्या नरड्यावर पाय देत लुटण्याचा उद्योग सुरू केला आहे.दुबार,नावे लावणे,नविन रेशनकार्ड काढणे,अन्नसुरक्षा यादीत नावे वाढविण्यासाठी सर्रास पैशाची मागणी हेत आहे.त्याशिवाय बोगस प्रकारासाठी पडद्यामागे अनेक सौदे झाले आहेत. त्यामुळे या विभागातील ही दरोडेखोरी ठेचलीच पाहिजे, अशी मागणी होत आहे.

        

येथील पुरवठा विभागातील लुटारूंच्या टोळीबद्दल गेल्या अनेक तक्रारी आहेत. मात्र कोणीही वरिष्ठांकडे लेखी तक्रार करीत नसल्याने या टोळीने दावं तोडलं होतं. याठिकाणी आलेल्या प्रत्येकाच्या नरडीचा नख लावून त्याला ओरबडण्यात येत आहे. याठिकाणी काम करून घेताना नागरिकांना तहसील कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात.

      

नागरिकांना रेशन कार्ड काढताना अगोदर एजंटांची टोळी लुटते. हीच टोळी नागरिकांना नागवून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे घर भरते.दररोज हजारो रुपये घशात कोंबूनच हे आपले कार्यालय सोडतात. गेल्या कित्येक महिन्यांपासून विनासायास हा लुटीचा गोरखधंदा सुरू आहे. 

     

 एजंट, पुरवठा विभागातील बोगस लोकं (उमेदवार) नागरिकांना लुटत आहेत.गोरगरिबांच्या घरावर नांगर फिरवून स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्या चौकशी होण्याची मागणी आहे. दवाखान्याच्या नावाखाली त्यांनी अनेकांना बोगस कागदपत्रे करून दिल्याचीही माहिती समोर येत आहे. सखोल तपासणी झाल्यास मोठे गौडबंगाल समोर येण्याची शक्यता आहे.

      


40 च्या कामासाठी हाजार रूपयापर्यत लुट...!

     शासनाच्या नियमानुसार पिवळे रेशनकार्ड दुबार काढायचे असेल तर 20 व केसरी रेशनकार्ड दुबार काढायचे असेल तर 40 रुपयांचे चलन करावे लागते. यापेक्षा जास्त एक रुपयाही लागत नाही. प्रत्यक्षात याठिकाणी नागरिकांना हजारो रुपयांना लुटले जाते.