शिक्षकांना कोवीड कामकाज,लसीकरण ड्युटीतून मुक्त करा

जत,संकेत टाइम्स : जिल्हा परिषद शाळा 15 जून पासून ऑनलाइन सुरू झालेल्या आहेत.शालेय शिक्षण विभागाचा सेतू कार्यक्रम 1 जुलै 2021 ते 14 ऑगस्ट 2021 अखेर सलग 45 दिवस आयोजित केला.त्यामुळे प्राथमिक शिक्षकांना कोविडच्या कामातून मुक्त करावे अशी मागणी,जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे शिक्षक भारतीने केली आहे.
शिक्षकांचे कामकाज नियमित सुरू झाले आहे.कोवीड ड्युटीमुळे शिक्षकांना दोन्ही कडील कामे करावी लागत आहेत.शिक्षकांनी आजपर्यंत कोवीड कामकाजामध्ये पडेल ते काम केले आहे.तेव्हा आता शिक्षकांना कोवीड कामकाजातून,लसीकरणाच्या ड्युटीमधून कार्यमुक्त करावे.भारतीचे जिल्हाध्यक्ष
महेश शरनाथे,कृष्णा पोळ,महेशकुमार चौगुले,बालम मुल्ला,विकास वायदंडे, दिगंबर सावंत यांच्या सह्या आहेत.