शिवसेना जनहितासाठी काम करणारा पक्ष ; दिनकर पंतगे

जत,संकेत टाइम्स : शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी काम करण्याचे आदेश दिले. शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागा, युती किंवा आघाडीची चिंता करू नका, असे आवाहन ठाकरे यांनी केले.12 जुलै ते 24 जुलै या काळात शिवसंपर्क अभियान राबवण्याचे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहे,त्यानुसार महाराष्ट्र कामगार सेनेकडून हे अभियान राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्र कामगार सेनेचे नेते दिनकर पंतगे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील वळसंग, कोळगीरी,व्हसपेठ,माडग्याळ,उटगी, लमाणतांडा,उमदी या गावांमध्ये शिवसंपर्क अभियानास सुरुवात करण्यात आली. 
या गावात जाऊन पंतगे व कामगार सेनेचे पदाधिकारी यांनी शिवसेना व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत असलेल्या लोकहिताच्या कामाची माहिती,लोंकाना दिली.त्याचबरोबर भीती मुक्त,कोरोना नियंत्रण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले माझा गाव कोरोना मुक्त गाव ही संकल्पना सर्व सामान्य जनते पुढे मांडली. उमदी येथील आत्महत्या केलेले शेतकरी रमेश शेवाळे यांच्या कुंटुबियाची भेट घेत‌ सांत्वन केले.
यावेळी कामगार सेनेचे तालुकाप्रमुख सुरेश घोडके,उपतालुका प्रमुख, शिवाजी पडोळकर,अर्जुन भोसले,मोहन पोतदार उपस्थित होते.


जत‌ तालुक्यात कामगार सेनेकडून शिव संपर्क अभियान राबविण्यात येत आहे.