जत-सांगोला महामार्ग ; अपुऱ्या रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले

शेगांव,संकेत टाइम्स : जत ते सांगोला या महामार्गाचे‌ शेगाव गावाजवळ काम रखडले आहे.त्यामुळे सातत्याने वाहने रस्त्यावरून खाली घसरत असल्याने अपघात घडत आहेत.नवा रस्ता करताना ठेकेदारांनी सर्व नियम ढाब्यावर बसवून काम सुरू ठेवले आहे.
महत्वाचा मार्ग असतानाही साईट रस्ते,रखडलेले काम यामुळे रस्ता अपघात प्रणव क्षेत्र बनला आहे. 


नुकताच अंरुद रस्त्यावरून एक मालवाहतूक ट्रक दुसऱ्या वाहनाला बाजू देताना थेट रस्त्याच्या खाली घसरत अडकून बसल्याने दिवसभर वाहतूक कोंडी झाली होती.असे प्रकार सातत्याने घडत आहेत.त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.रस्ते प्राधिकरण विभागाने रस्ते कामाची पाहणी करून रखडलेले कामे गतीने करावीत,त्याशिवाय साईट रस्त्याचे कामे मजबूत असावीत अशी मागणी, वाहन चालकांतून होत आहे.


 जत-सांगोला महामार्गाचे अनेक ठिकाणी काम रखडले आहे,तेथे सातत्याने असे अपघात होत आहेत.