उमदी येथे एका शेतकऱ्यांची खाजगी कर्जास कंटाळून आत्महत्या

बालगांव,संकेत टाइम्स : उमदी ता.जत येथील रमेश शेवाळ वय 45 या शेतकऱ्यांने कर्जास कंटाळून उमदी-सलगर रोडलगत असणाऱ्या रामबागेतील शेतात चिंचेच्या झाडाला नाईलाँनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
         


अधिक माहिती अशी की, जत तालुक्यातील उमदी येथील रमेश मारुती शेवाळे यांनी खाजगी सावकारीच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली.उमदी-सलगर रस्त्यावर उमदी बसस्थानका पासून 1 किलोमीटर अंतरावर रामबाण या ठिकाणी ही घटना घडली. त्याने खाजगी सावकारी लोकांच्या कडून कर्ज काढले होते.

ते लोक सारखे तगादा लावत असल्याने यातून त्याने आत्महत्या केली असावी अशी चर्चा आहे. मागील काही आठवडयापूर्वी त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र लोकांच्या जागृततेने त्यास परत पाठविले होते. उमदी पोलीसांनी घटनेचा पचंनामा करुन मृत्तदेह शवविच्छेदनासाठी उमदी प्राथमिक आरोग्य केद्रात पाठवला आहे. अधिक पोलीस उपनिरीक्षक नामदेव दांडगे करत आहेत.