आरपीआयच्या आंदोलनाची तात्काळ दखल | राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाच्या पथकाकडून रस्त्याची पाहणी ; गतीने कामे सुरू होणार

0



जत,संकेत टाइम्स : जत शहरातील राष्ट्रीय महामार्गावर रिपाइंने केलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण विभागाच्या पथकांकडून जत शहरातील राष्ट्रीय महामार्गाची पहाणी करत रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

जत शहरातून जाणारे राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे त्वरीत भरावेत व रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात यावे. 






या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे व उपाध्यक्ष विकास साबळे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या खड्ड्यात केलेल्या वृक्षारोपण आंदोलनाची दखल राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरण विभाग कोल्हापूरने घेतली असून आज गुरूवारी राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरण विभाग कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता श्री. सायगावकर व त्यांच्या पथकानी जत शहरातून जाणारे राष्ट्रीय महामार्गाची पहाणी केली.

जत शहरातील डाॅ.रविंद्र आरळी हाॅस्पीटल ते श्री.रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर काॅलेजपर्यंत इस्लामपूर, तासगाव लांडगेवाडी -कवठेमहांकाळ – जत – चडचण या राष्ट्रीय महामार्गाचे काम जत ते डफळापुर पर्यंत अर्धवट करण्यात आले असून या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. 







जत शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून दररोज लहानमोठे अपघात होत आहेत.पावसाळ्याच्या दिवसात तर खड्ड्यात पाणी साचून दुचाकीचे अपघात होत आहेत. 

यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून हे खड्डे त्वरीत मुजवून रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू करावे, यासाठी तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.166 विजापूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गाचे जत शहरातील काम निकृष्ठ व दर्जा हिन झाले असून रस्त्याची रूंदी ही कमी ठेवल्याने त्याच प्रमाणे रस्त्याचे दोन्ही बाजूला असलेल्या गटारीचे व पेव्हींग ब्लाॅकचे काम निकृष्ठ व दर्जा हिन झाल्याने या संपूर्ण कामाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करावी,यासाठी त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यात वृक्षारोपण आंदोलन केले होते.

Rate Card







या आंदोलनाची दखल घेऊन जतचे उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे यांनी राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरण विभाग कोल्हापूरचे अधिकारी यांना जत येथे बैठकिसाठी बोलावले होते.पं.स.सभागृहात आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.या बैठकीनंतर रि.पा.इं.चे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरण विभागाचे कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता  श्री.सायगावकर, डेप्युटी इंजिनिअर श्री. शिरगुप्पे, जतचे उपविभागीय अधिकारी श्री.आवटे, तहसिलदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत विजापूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गाची व डाॅ.रविंद्र आरळी काॅर्नर,छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्याची पहाणी केली.या संदर्भात जे  काही दुरूस्तीचे काम आहे,त्या कामाला आठवड्यात सुरूवात करण्याचे अश्वासन या पथकाने दिले.





शहरातील या राष्ट्रीय महामार्गामुळे वाहतूकीची कोंडी होऊ नये याकरिता शहराच्या बाहेरून रिंगरोड तसेच बायपास रस्ते करण्यात यावेत, त्या दृष्टीने आपल्या मार्फत केंद्राकडे तसा प्रस्ताव तयार करून पाठविण्यात यावा,असे यावेळी प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांनी सांगितले.





जत शहरातील राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करताना कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता श्री.सायगावकर,प्रांताधिकारी प्रंशात आवटे, तहसीलदार सचिन पाटील,रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे आदी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.