जतेत परप्रांतीय कामगाराचा मृत्तदेह आढळला

जत,संकेत टाइम्स : जत येथे एका परप्रांतीय कामगारांचा म‌यत स्थितीतील मृत्तदेह कांरडे ऑटोमोबाइल दुकाना समोर आढळून आला.बाबू हेमा परमार (वय 55,रा.दत्त कॉलनी जत,मुळ सोडोगरी,ता.डिसा,जि.पालकूर गुजरात)असे त्यांचे नाव आहे.
अधिक माहिती अशी,
जत शहरातील विजापूर-गुहागर महामार्ग सातारा चौकातील कांरडे ऑटोमोबाइल दुकाना समोर बाबू परमार यांचा मयत स्थितीतील मृत्तदेह आढळून आला. 


अनिल मदने यांनी याप्रकरणी जत पोलीसांना कळविल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी पोहचत मृत्तदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठविला आहे. मयत परमार यांच्या नातेवाईना कळविण्यात आले आहे.दरम्यान परमार यांचा मुत्यू कशामुळे झाला यांची माहिती मिळू शकली नाही.