शेगाव येथे साकारले चिंच विसावा अग्रो टुरिझम सेंटर

शेगांव,संकेत टाइम्स : चिंच विसावा अग्रो टुरिझम शेगांव (जत), जिल्हा सांगली या नाविण्यपुर्ण संकल्पना असलेल्या  उपक्रमाचे उद्घाटन कार्यक्रम यु ट्यूब चॅनेल वर ऑनलाईन पद्धतीने तहसीलदार सचिन पाटील यांच्याहस्ते
पार पडला. या ऍग्रो टुरिझमचे वैशिष्ट्य म्हणजे येथे आपल्या वाडवडिलांच्या जीवनमानाची शैली समजून येईल,या पद्धतीने रचना तयार करण्यात आली आहे. 


ऍग्रो टुरिझम ही नवीन संकल्पना चिंच विसावा येथे सौ.उज्वला बोराडे व प्रल्हाद बोराडे यांनी शेगांव येथे साकारली आहे.
जत सारख्या दुष्काळी भागात अशा प्रकारचा उपक्रम कौतुकास्पद आहे.यावेळी कृषी उपविभागीय मुख्य अधिकारी मनोज वेताळ,सा.पो.नि. भोसले,डॉ.शालिवान पट्टणशेट्टी डाॅ. शिवाजी खिलारे, डॉ.संभाजी देशमुख,  श्री.कोळसे सर,श्री.नदाफ सर,कुमार बोराडे,उपसरपंच सचिन बोराडे,नवनाथ केदार आदी मान्यवर उपस्थित होते.


चिंच विसावा या निसर्ग रम्य परिसराचे उद्घाटन करताना तहसीलदार श्री.सचिन पाटील यांच्याहस्ते संपन्न झाले.