गुंठेवारी खरेदीला शासनाचा लगाम | तुकडेबंदी का‌यद्याचा‌ गैरवापरला रोक ; सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज

जत,संकेत टाइम्स : यापुढे प्रमाणभूत क्षेत्र (गुंठेवारी) जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना सक्षम अधिकारी यांची परवानगी असेल तरच हे व्यवहार करता  येणार असल्याचा शासन निर्णय निघाल्याने गुंठेवारी जमिनीत प्लाॅट पाडून त्याची विक्री करणारे इस्टेट एजंट यांचे धाबे दणाणले आहे.
जत तालुक्यात जमिनी खरेदी-विक्रीचे कामी प्रशासनाने जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र हे जिरायत जमिन असेल तर दोन एकर व बागायत जमिन असेल तर एक एकर असे प्रमाणभूत क्षेत्र जाहीर केले असून जत नगरपरिषद हद्दीतील जमीनीचे प्रमाणभूत क्षेत्र हे चार एकर जिरायत व दोन एकर बागायत असे जाहीर केले आहे. यापूर्वी तुकडेबंदी कायद्यांतर्गत प्रमाणभूत क्षेत्राच्या आतील जमिनीचे गुंठेवारी खरेदी-विक्रीचे व्यवहार होत होते.परंतु आता अशा जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना सक्षम अधिकारी व जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. 
समजा एखाद्या सर्वेनंबरचे क्षेत्र दोन एकर आहे.त्यातील तुम्ही एक गुंठा, दोन गुंठा, तीन गुंठे जमिन खरेदी घेणार असाल तर त्याची दस्तनोंदणी होणार नाही. मात्र त्याच सर्वेनंबर चा लेआऊट मंजूर असेल आणी त्यात दोन गुंठ्याचे तुकडे पाडून  त्याला जिल्हाधिकारी तसेच सक्षम प्राधिकरणाची मंजूरी घेतली असेल तर यांची परवानगी घेतली असेलतर अशा मान्य लेआऊट मधिल दोनगुंठे व्यवहाराची दस्तनोंदणी होणार आहे.जिल्हाधिकारी तथा स्थानिक स्वराज्य संस्थाची मंजूरी घेतली असलीतरी अशा मान्य लेआऊट मधिल एक दोन गुंठे जमिनीच्या व्यवहाराची यापुढे दस्त नोंदणी होणार आहे. 
याबाबतचे परिपत्रक नोंदणी व मुद्रांक विभागाने दिनांक 12 जुलै 2021 रोजी काढले आहे. या निर्णयामुळे बेकायदा जमिनीचे तुकडे करून एक,दोन गुंठे जमिनीची विक्री करण्याचा प्रकार बंद होणार आहे. गेल्या काही वर्षात जमिनीचे तुकडे करून त्याची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. महसुल अधिनियमातील तरतूदीनुसार तुकडेबंदी लागू आहे.तरीदेखिल असे व्यवहार होत असून.त्याची दस्तनोंदणी देखील होत आहे. मध्यंतरी राज्य शासनाने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीत असे अनेक प्रकार झाले असल्याचे निदर्शनास आले होते.त्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने अशा दस्ताची नोंदणी करण्याचे बंद केले होते. परंतु जत दुय्यम निबंधक कार्यालयात मात्र इस्टेट एजंट यांच्याकडून मिळत असलेल्या मोबदल्यापोटी असे व्यवहार राजरोसपणे सुरूच होते.त्यामुळे जत शहरालगत असलेल्या ओढापात्रा लगतच्या तसेच जत नगरिची ग्रामदेवता महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. यल्लमादेवी यात्रेकरिता अरक्षित असलेल्या जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार हे गुंठेवारी प्लाॅटींग करून केले असून हे सर्व व्यवहार बेकायदेशीर आहेत. जत दुय्यम निबंधक कार्यालयात यापूर्वी करण्यात आलेले गुंठेवारी जमिन व प्लाॅट च्या व्यवहारकामी सबंधिताकडून जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकरण अधिकारी यांच्याकडून कायदेशीर प्रमाणभूत क्षेत्राच्या आतील गुंठेवारी जमिनीच्या खरेदी-विक्रीचे कामी परवानगी न घेतल्यामुळे हे सर्व व्यवहार वादात सापडले असून दिनांक.12 जुलै  2021 च्या शासन आदेशानुसार या गुंठेवारी जमिनीचे खरेदी-विक्रीचे झालेल्या व्यवहाराला ही सक्षम प्राधिकरण अधिकारी व जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक होते.
त्यामुळे यापुढील काळात गुंठेवारी जमिनीचे व्यवहार करताना  जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकरण अधिकारी यांच्या परवानगी शिवाय दस्त  नोंदणी चे कामकाज होणार नसल्याने गुंठेवारी जमिन व प्लाॅट चे बेकायदेशीर व्यवहार करणारेंचे धाबे दणाणले आहे.