जत तालुक्यात रिपाइं भाजपाशी सोडचिठ्ठी घेण्याच्या तयारीत ; विकास‌ साबळे

जत,संकेत टाइम्स : केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी भाजप बरोबर देशपातळीवर महायुती केली आहे.त्यामुळे आठवले साहेबांच्या आदेशाचे पालन करून रिपब्लिकन कार्यकर्ते लोकसभा , विधानसभा पदवीधर जिल्हा परिषद पंचायत , समिती नगरपरिषद मध्ये भाजप उमेदवारांना मनापासून आणि प्रामाणिकपणे प्रचार करून निवडून आणण्याचे प्रामाणिक काम केले आहे. वेगळ्या मतदारसंघात मताधिक्य मिळवून दिले आहे.


परंतु मतदान झाल्यानंतर भाजपा मित्रपक्ष म्हणून आम्हाला कधीही विचारात घेत नाही,शिवाय निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही. तसेच अशासकीय समितीवर निवड महायुतीची ध्येयधोरणे याबाबत मित्रपक्ष या नात्याने विचारात घेतले जात नाही. मतदानाच्या वेळी प्रचाराच्या गाडीवर व सभामंडपात फक्त आरपीआयच्या झेंडा चा वापर करायचा कार्यकर्त्यांचा वापर करायचा आणि नंतर सोडून द्यायची असे धोरण भाजपाने अवलंबिले आहे.परंतु आमचे नेते रामदास आठवले यांचा आदेश असल्यामुळे सर्व नेते व कार्यकर्ते भाजपा बरोबर महायुतीचे प्रामाणिकपणे काम करतात हे माहीत असल्याने भाजपचे नेते मंडळी रिपाईला बेदखल करताना दिसत आहेत.जत नगरपरिषद मध्ये गत निवडणुकीत दोन जागेची मागणी केली असताना सुद्धा एक जागा देऊन पक्षाची बोळवण केली, तरीपण रिपाइंने जत शहरातील सर्व प्रभात भाजपच्या उमेदवाराचा मन लावून प्रामाणिकपणे प्रचार केला. रिपाईचा उमेदवार पराजित झाला असला तरी पडलेली मते दुर्लक्षित करण्यासारखी नाहीत. जत शहरात प्रत्येक प्रभागात कार्यकर्ते,मतदार मोठ्या संख्येने आहेत.


त्यामुळे युती धर्म म्हणून आम्ही जत नगरपरिषद मध्ये स्विकृत नगरसेवक पद रिपाइं देण्याची मागणी केली होती.त्याचा विचार तालुका भाजप नेत्यांनी केला नाही, त्यामुळे रिपाइंच्या सर्व कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष संजयर कांबळे यांना भेटून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.पुढील वाटचाल व महायुतीची दिशा ठरवण्याचा निर्णय  जिल्हाध्यक्ष यांनी घेऊन लवकरच काय ते मार्गदर्शन सर्व कार्यकर्त्यांना करावे,अशी मागणी रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी केले आहे.