'जगावं की मरावं' | राष्ट्रवादी कॉग्रेस आक्रमक ; जतेत महागाईच्या निर्षेधार्थ आंदोलन

जत,संकेत टाइम्स : आज महागाई आणि इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य गांजलाय. त्यात आता घरातल्या गृहिणीचंही बजेट नरेंद्र मोदींच्या भाजपाशासित केंद्र सरकारने कोलमडवलं आहे. ज्यावर सर्वसामान्य माणसाच्या घरातला स्वंयपाक होतो,तो एलपीजी गॅस सिलिंडरचा दर अचानक 25 रुपयांनी वाढवलाय.


"जगावं की मरावं" या प्रश्नावर आता मन की बातचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जत तालुका वतीने देशातील इंधन दरवाढ व महागाई विरोधात,केंद्र सरकारच्या निषेधार्थ जाहीर निषेध आंदोलन करत,तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन दिले.
सुरेशराव शिंदे म्हणाले,आता घरगुती गॅस सिंलिंडरची किंमत वाढून 847 रुपये झाली आहे.सर्वसामान्य कुटुंबाला साधारणतः 20 दिवसच एक सिलिंडर पुरतं. त्यामुळे ज्याचं मासिक उत्पन्न कसंबसं सहा ते 10 हजार रुपयांच्या आसपास आहे, त्या देशातल्या सर्वसामान्यांच्या घराचा इंधनाचा खर्च मोदींनी दीड हजार रुपयांचा करून ठेवला आहे.आज इंधन दरवाढीवर ताशेरे ओढूनही मोदी सरकार ढिम्म हलायलाही तयार नाही. पेट्रोल शंभरीपार गेलं तेव्हा लोकांनी त्यावर विनोद केले. सोशल मीडियावर मिम झाले. पण केंद्र सरकारने काहीच उपाययोजना केली नाही. केवळ निवडणुकी पुरतंच गिमिक करायचं त्या त्या राज्यात निवडणुका लागल्या की इंधन दरवाढ नियंत्रित करायची आणि निवडणुका संपल्या की आपल्या आश्वासनांचा विसर पडत सर्वसामान्य माणसांना वाऱ्यावर सोडायचं हा भाजपाचा खाक्या. 


रमेश पाटील म्हणाले,केंद्र शासनाने पेट्रोल त1 दर 06 रुपयांच्या पुढे नेहून ठेवले आहेत.डिझेलही शंभरीचा पल्ला गाठत आहे. पेट्रोलच्या सेंच्युरीच्या विनोदाचे केंद्र सरकारला फारसे वावडे उरलेले नाही. त्यांची कातडी निबार झाली आहे. मात्र सर्वसामान्य माणसाच्या तोंडचं अन्नही आता मोदीजी हिरावून घेऊ पाहात आहेत, हेच का त्यांचे अच्छे दिन.आज केंद्रात सत्ता असलेले भाजपाचे लोक एकेकाळी इंधन दरवाढीवरून आकाश पाताळ एक करायचे. सरकारच्या नावाने खडे फोडायचे. आता त्या कालखंडाच्या दुप्पट-तिप्पट इंधनाचे दर झालेत. परंतु केंद्र सरकार दरांचं नियमन करायला तयार नाही. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य माणसांचं कंबरडं मोडलं तरी चालेल अशी या मोदी सरकारची भूमिका आहे.



इंधन दरवाढीचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य माणसाला बसतो. सध्या गेल्या दीड वर्षांतल्या कोविड प्रादुर्भावाच्या कालखंडामध्ये अनेकांचे रोजगार गेले आहेत, ज्यांचे रोजगार आहेत त्याच्या मिळकतीमध्ये कपात झाली आहे. त्यामुळे आपला खर्च कसा मिळवायचा याचा एक ही समस्या लोकांसमोर आहे. अशा कालखंडात केंद्र सरकार मात्र मूग गिळून बसलं आहे. त्यांना कुठलीच संवेदनशीलता राहिलेली नाही.

यावेळी कार्याध्यक्ष उत्तम चव्हाण, सिद्ध शीरसाड, जिल्हा उपाध्यक्ष बसवराज धोडमनी,संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग, तालुका उपाध्यक्ष मच्छिंद्र वाघमोडे,माजी सभापती शिवाजी शिंदे,नगरसेवक स्वप्निल शिंदे, युवक जिल्हा उपाध्यक्ष अशोक कोळी, आप्पासाहेब पुजारी, विद्यार्थी तालुका अध्यक्ष पवन कोळी, पिरसाहेब शेख, नवाज शेख, श्रीधर हिरगोंड, लक्ष्मण कदरे, विकास लेंगरे, हेमंत खाडे, राहुलसिंह डफळे, राजेसाहेब डफळे, भाऊसाहेब शिंदे,सतिश शिंदे, संभाजी शिंदे, संजय शिंदे, सचिन बोराडे, दादासाहेब पाटील, संभाजी पाटील, यशवंत कोळी,रमेश माळी,अजयकुमार शिंदे, आशपाक बारुदवाले,शफीक इनामदार, इम्रान गवंडी, हाजीसाब पापा हुजरे,लालासाब हैद्राबादे, शौकत शेख, राजू मुल्ला, नंदकुमार निळे, प्रकाशबापू पाटील, राजकुमार शिंदे मेजर, सदाशिव कांबळे, युवराज पाटोळे व इतर असंख्य  पदाधिकारी उपस्थित होते.


जत : महागाईच्या विरोधात‌ राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने जत तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.